रोशन बोडवे उर्फ रोशन ठाकूर यांच्यावर पोलीस कर्मचाऱ्यांची बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल

Thu 16-Apr-2026,09:24 PM IST -07:00
Beach Activities

रोशन बोडवे उर्फ रोशन ठाकूर यांच्यावर पोलीस कर्मचाऱ्यांची बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल

अभद्र भाषेत बातम्या प्रकाशित केल्याप्रकरणी संपादकाविरुद्ध कारवाई सुरू

 

*हाच तो संपादक रोशन बोड़वे स्वताला ठाकुर नाव लाउन अभद्र भाषेत बातम्या प्रकाशित करुण लोकशाही च्या चौथ्या स्तंभाला बदनाम करतोय*

 

नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा 

वर्धा,वर्धा : दी 14 एप्रिल फोटोमध्ये छेडछाड करून परवानगीशिवाय वृत्त प्रसिद्ध करणे तसेच सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर व्हायरल केल्याप्रकरणी सिंदी रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा गुणवंत पळनाटे (वय 36, पो.स्टे. सिंदी रेल्वे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी रोशन बोडवे उर्फ रोशन ठाकूर (रा. वर्धा) याच्याविरुद्ध अप.क्र. 118/2026 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादी यांचा वाढदिवस 1 एप्रिल रोजी असल्याने मित्रमंडळींनी सोशल मीडियावर शुभेच्छा देताना त्यांचे फोटो शेअर केले होते. याच पार्श्वभूमीवर आरोपीने 3 एप्रिल रोजी ‘दैनिक हिंदू जागर’ या वृत्तपत्रात फिर्यादीचा फोटो वापरून बातमी प्रसिद्ध केली.

सदर बातमीत फिर्यादी यांचा फोटो वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या वर्दीत दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच कोणतीही पूर्वपरवानगी न घेता ही बातमी प्रसिद्ध करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली,

ज्यामुळे फिर्यादीची प्रतिमा नागरिकांमध्ये मलिन झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

फिर्यादी यांनी संबंधित संपादकाशी संपर्क साधून विचारणा केली असता, प्रकाशित फोटो व बातमी त्याच्याकडूनच देण्यात आल्याची कबुली दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, आरोपीने ‘दैनिक हिंदू जागर’ या माध्यमातून सिंदी रेल्वे पोलिस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल धनराज सयाम व कॉन्स्टेबल समीर आगे यांच्याबाबतही अत्यंत आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर फोटोसह प्रकाशित करून तो सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

संबंधित बातम्यांमध्ये पोलिस दलाची प्रतिमा डागाळेल अशा प्रकारची अभद्र भाषा वापरण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

ही संपूर्ण घटना 3 एप्रिल ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत घडल्याचे सांगण्यात आले

असून, 14 एप्रिल रोजी सायंकाळी 4.33 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याची नोंद पोलीस कर्मचारी प्रफुल डफ यांनी केली असून, तपास पोलीस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

या प्रकरणामुळे पत्रकारिता व सोशल मीडियाच्या जबाबदारीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, पोलिसांकडून आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.