इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अल्लीपूरची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अल्लीपूरची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
तालुका प्रतिनिधी सुनील हिंगे, अल्लीपूर
अल्लीपूर एच.एस.सी. फेब्रुवारी/मार्च २०२६ परीक्षेचा निकाल दि. २ मे २०२६ रोजी जाहीर झाला असून, अल्लिपूर येथील इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने यंदाही आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.
महाविद्यालयाचा एकूण निकाल ८८.१७ टक्के लागला असून, विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के तर कला शाखेचा निकाल ७५ टक्के लागला आहे.
विज्ञान शाखेत श्लोक दत्ताजी भांगे याने ७६.६७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. श्रद्धा चंदुजी पोहाने हिने ७१.८३ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर सुधीर पद्माकर ढगे याने ६८.३३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.
कला शाखेत राधा भोजराज रघाटाटे हिने ७५.८३ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. अनुष्का महादेव चट्टेकार हिने ७५.३३ टक्के गुणांसह द्वितीय, तर जान्हवी अर्जुन साखरकर हिने ६६.६७ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला. या सहाही विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय येण्याचा मान मिळवला.
प्राचार्या अर्चना मुडे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत अभिनंदन केले. संस्थेचे अध्यक्ष वामनराव खोडे, सचिव योगेश खोडे व पर्यवेक्षक नरेश येडे यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उत्तीर्ण व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, प्राचार्या व शिक्षकांना दिले.