मॉडेल हायस्कूलचा दहावीचा निकाल ८४ टक्के
मॉडेल हायस्कूलचा दहावीचा निकाल ८४ टक्के
गुणवंत विद्यार्थ्यांनी कायम राखली यशाची परंपरा
नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा
कारंजा (घा.) | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, कारंजा येथील मॉडेल हायस्कूलने यंदाही उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाळेचा एकूण निकाल ८४ टक्के लागला असून गुणवंत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
यामध्ये कु. प्रगती दिलीप चोपडे हिने ९५.२० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. तर कु. तेजल सितेश भादे हिने ९२.२० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. कु. नेहा संजय डिग्रसे हिने ९१.६० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच संकेत अनिल बैगने याने ९१.२० टक्के गुण मिळवून शाळेत चौथा क्रमांक मिळविला.
यंदा शाळेतून एकूण ३२४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष प्राविण्य श्रेणीत ४३ विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत ७३ विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा ॲड. शोभाताई काळे, सचिव संदीप काळे, मुख्याध्यापक विनोद कहारे, उपमुख्याध्यापक रवींद्र डोंगरदेव, पर्यवेक्षक चंद्रशेखर गिऱ्हाळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल पालकांमध्ये व शाळा परिसरात आनंदाचे वातावरण आहे.