अवैध दारू वाहतुकीवर सावंगी मेघे पोलिसांची धडक कारवाई; २ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त
अवैध दारू वाहतुकीवर सावंगी मेघे पोलिसांची धडक कारवाई; २ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त
वर्धा | प्रतिनिधी – इरशाद शहा
सावंगी (मेघे) पोलीस स्टेशनच्या पथकाने अवैध गावठी मोहा दारू वाहतुकीवर धडक कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेत २ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस स्टेशन सावंगी (मेघे) येथील पोलीस पथक परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मुखबिरामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, आरोपी १) आर्यन संदीप शंभरकर (वय १९, रा. पालोती, ता. जि. वर्धा) व आरोपी २) जितू मारोती गायकवाड (वय ३८, रा. स्टेशनफैल, ता. जि. वर्धा) हे दोघे मोटारसायकलद्वारे गावठी मोहा दारूची अवैधरित्या वाहतूक करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी पंच व पोलीस स्टाफच्या मदतीने सावंगी मेघे ते पालोती रोडवरील स्कूल ऑफ स्कॉलर्स समोर नाकाबंदी करून छापा टाकला. यावेळी आरोपींच्या ताब्यातून हिरव्या रंगाची सुझुकी वर्गमन दुचाकी (क्र. MH-32-AZ-1671) किंमत १ लाख २० हजार रुपये व २० लिटर गावठी मोहा दारू किंमत ४ हजार रुपये असा एकूण १ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तसेच काळ्या रंगाची टीव्हीएस रेडॉन दुचाकी (क्र. MH-32-AP-7066) किंमत १ लाख रुपये व २० लिटर गावठी मोहा दारू किंमत ४ हजार रुपये असा एकूण १ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत एकूण २ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे, पोलीस हवालदार अभय खोब्रागडे, पोलीस शिपाई शाम सलामे व गौरव नरताम यांनी केली.