जिल्हा परिषद उर्दू प्रशाला,वसमतचा दहावीच्या बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट निकाल,विद्यार्थ्यांच्या यशाने आनंदाचे वातावरण

Fri 15-May-2026,12:24 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली

हिंगोली : वसमत येथील जिल्हा परिषद उर्दू प्रशाला, वसमतने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या दहावीच्या बोर्ड परीक्षेत ६८.४० टक्के निकाल लावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

शाळेत एकूण ३९ विद्यार्थी नोंदणीकृत होते. त्यापैकी ३८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामध्ये २६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एक विद्यार्थी ए.टी.के.टी.द्वारे उत्तीर्ण झाला आहे. एक विद्यार्थी अनुपस्थित होता. विशेष म्हणजे, ही परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त वातावरणात पार पडली असून विद्यार्थ्यांनी कोणत्याही खासगी ट्युशनशिवाय हे यश मिळविले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद उर्दू प्रशाला, वसमतचा निकाल विशेष अभिनंदनास पात्र ठरत आहे. या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची अथक मेहनत असल्याचे मानले जात आहे.

गुणवंत विद्यार्थी

यावर्षीच्या परीक्षेत खालील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन करून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे:

१. सना अंजुम जमील शेख — प्रथम क्रमांक

२. शिफा माहिरीन अब्दुल कय्युम — द्वितीय क्रमांक

३. आयेशा तय्यब शेख — तृतीय क्रमांक पटकावला आहें

या यशाबद्दल प्रशालेच्या शिक्षिका अतीया हिना मैडम, अस्मा मैडम,राशेदा मैडम तसेच शिक्षक अन्वर खान सर, सय्यद अब्दुल्ला साबेर सर, मोहम्मद शब्बीर सर आणि जमील सरवरी सर यांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले.