हरवलेल्या चिमुकल्याला सावंगी मेघे पोलिसांनी कुटुंबीयांशी केले पुन्हा एकत्र

Sun 17-May-2026,03:10 AM IST -07:00
Beach Activities

हरवलेल्या चिमुकल्याला सावंगी मेघे पोलिसांनी कुटुंबीयांशी केले पुन्हा एकत्र

वर्धा | प्रतिनिधी : इरशाद शाह

वर्धा : सावंगी मेघे पोलीस स्टेशनच्या तत्परतेमुळे हरवलेला चार वर्षीय चिमुकला सुखरूपपणे कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. या संवेदनशील व मानवतावादी कार्याबद्दल परिसरात पोलिसांचे कौतुक होत आहे.

दि. १४ मे २०२६ रोजी सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास संकेत थुल, रा. सावंगी टी-पॉईंट यांनी एक चार वर्षीय मुलगा एकटाच रडत असल्याचे पाहिले. त्यांनी तत्काळ त्या मुलाला सावंगी मेघे पोलीस स्टेशन येथे आणून पोलिसांच्या ताब्यात दिले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा ठाणेदार पंकज वाघोडे यांनी मुलाला विश्वासात घेत त्याला खाऊ व पिण्याचे पाणी दिले. प्रेमाने विचारपूस केल्यानंतर मुलाने आपले नाव “ओम” असल्याचे सांगितले. त्यानंतर ठाणेदारांनी PSI डोणेकर, पोलीस शिपाई गौरव, NPC प्रियांका घुगरे व HC संजय पटले यांचे विशेष पथक तयार करून मुलाच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे निर्देश दिले.

पथकाने तातडीने परिसरात शोधमोहीम राबवून राजीव नगर, सावंगी मेघे येथे मुलाचे घर शोधून काढले. त्यानंतर सदर मुलास त्याची आई सौ. पुनम आकाश दंडारे यांच्या ताब्यात सुखरूप सुपूर्द करण्यात आले.

आपला मुलगा सुरक्षित परत मिळाल्याने आई व कुटुंबीयांनी सावंगी मेघे पोलिसांचे आभार मानले.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे व प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे, PSI डोणेकर, पोलीस शिपाई गौरव, NPC प्रियांका घुगरे व HC संजय पटले यांनी केली.