पुलगाव पोलिसांची कारवाई; ७५ हजारांचा गावठी मोहादारूचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी ताब्यात
पुलगाव पोलिसांची कारवाई; ७५ हजारांचा गावठी मोहादारूचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी ताब्यात
( नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा )
देवळी तालुक्यातील पुलगाव परिसरात पुलगाव पोलिसांनी गावठी मोहादारू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेत ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई २८ मे २०२६ रोजी सायंकाळी ७.३० ते ८.१० वाजताच्या दरम्यान भिमलाईन कच्चा रोड, पुलगाव येथे करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पुलगाव पोलीस स्टेशन हद्दीत नाकाबंदी करण्यात आली होती. दरम्यान आरोपी रोशन मनोहर कांबळे (वय २९, रा. हिंगणघाट फैल, पुलगाव ता. देवळी) व रोहित बिहारीलाल तिवारी (वय २७, रा. हिंगणघाट फैल, पुलगाव ता. देवळी) हे त्यांच्या ताब्यातील वाहनातून गावठी मोहादारू वाहतूक करताना आढळून आले.
पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन पंचनामा केला. आरोपींकडून दोन प्लास्टिक कॅनमध्ये प्रत्येकी ३५ लिटरप्रमाणे एकूण ७० लिटर गावठी मोहादारू, अंदाजे १० हजार ५०० रुपये किमतीची जप्त करण्यात आली. तसेच मोहादारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची एसेस मोपेड (क्र. MH 49 BG 7381) किंमत अंदाजे ६५ हजार रुपये जप्त करण्यात आली. एकूण ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध कलम ६५ (ई), ८३ महाराष्ट्र दारूबंदी कायदा तसेच कलम ३(१), १८१, १३०, १७७ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार विनोद रघाटाटे करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक यशवंत सोळसे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मदनकर, पोलीस हवालदार विनोद रघाटाटे, अजय अनंतवार, गणेश इंगळे व सोमेश गंधाडे यांनी केली.