एक वर्षापूर्वी पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका; उत्तर प्रदेशातून आरोपी जेरबंद
एक वर्षापूर्वी पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका; उत्तर प्रदेशातून आरोपी जेरबंद
वडनेर पोलिस व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची यशस्वी कारवाई
प्रतिनिधि इरशाद शाह वर्धा
वर्धा : एक वर्षापूर्वी अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीला उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातून अटक करण्यात आली असून पीडित मुलीची सुखरूप सुटका करण्यात वर्धा पोलिसांना यश आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादीने 11 एप्रिल 2025 रोजी वडनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार देण्यात आली होती. यावरून वडनेर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 137/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 137(2) अन्वये गुन्हा नोंद करून तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान पीडित मुलगी व आरोपीचा शोध लागत नसल्याने गुन्ह्यात पुढे कलम 143(4) ची वाढ करण्यात आली आणि प्रकरण अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आले.
पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या विशेष सूचनांनुसार स्थानिक गुन्हे शाखा व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे आरोपी व पीडित मुलीचा शोध सुरू ठेवला. तपासादरम्यान आरोपी आणि मुलगी हे उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज जिल्ह्यातील मौजा खाखोपुर येथे राहत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी तेथे सापळा रचून आरोपी सौरभ भास्कर गगनाईक (वय 22, रा. घुग्घूस, जि. चंद्रपूर) याला अटक केली. तसेच अल्पवयीन पीडित मुलीची सुखरूप सुटका करून तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या मोहिमेत सुभाष राऊत, दिवाकर परिमळ, अमर लाखे, नितेश मेश्राम, संजयसिंग सूर्यवंशी, संजय राठोड, चंद्रकांत बुरंगे, नवनाथ मुंडे, महिला पोलीस हवालदार शबाना शेख तसेच सायबर सेलचे अक्षय राऊत व गोविंद मुंडे यांनी सहभाग घेतला.
प्रकरणाचा पुढील तपास वडनेर पोलीस ठाणे करीत आहे.