वर्धा जिल्हा कामगार सेना अध्यक्षपदी तुषार देवढे यांची नियुक्ती नागपूर येथील राज्यस्तरीय मेळाव्यात नियुक्तीपत्र प्रदान; शिवसैनिकांकडून अभिनंदन
वर्धा जिल्हा कामगार सेना अध्यक्षपदी तुषार देवढे यांची नियुक्ती
नागपूर येथील राज्यस्तरीय मेळाव्यात नियुक्तीपत्र प्रदान; शिवसैनिकांकडून अभिनंदन
वर्धा प्रतिनिधी : युसूफ पठाण
नागपूर येथील रवी भवन येथे 26 जून रोजी राष्ट्रीय कामगार सेना, महाराष्ट्र राज्याचा भव्य मेळावा उत्साहात पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा जपत, शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या मेळाव्यात वर्धा जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्ते तुषार देवढे यांच्या संघटनात्मक कार्याची दखल घेत त्यांची वर्धा जिल्हा कामगार सेना अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. राज्यातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाला माजी खासदार तथा नागपूर जिल्हा संपर्कप्रमुख संजय निरूपम, महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल, राष्ट्रीय कामगार सेना प्रदेश सचिव अमित भटनागर, महिला कामगार सेना प्रदेशाध्यक्ष आशाताई वैकुंठे, राष्ट्रीय कामगार सेना कार्याध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, पूर्व विदर्भ अध्यक्ष दिलीप आवळे, विदर्भ अध्यक्ष आकाश हेरोळे, पूर्व विदर्भ सरचिटणीस मनोज मेश्राम, विदर्भ सरचिटणीस बंडू तळवेकर, कॉम्रेड अक्रम पठाण यांच्यासह राज्य व विदर्भातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
नियुक्तीनंतर तुषार देवढे यांनी पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या नियुक्तीबद्दल नवनाथ भुसनर, स्वप्निल गोटे, अविनाश उबाळे, मनोज आत्राम, निखिल तसेच शिवसेना व कामगार सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.