जनसेवा सप्ताहात पत्रकारांचा सन्मान,कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली : वसमत येथे जनसेवा सप्ताहाच्या सात दिवसांत विविध समाजोपयोगी, आरोग्यविषयक, जनहिताचे आणि सामाजिक सेवा उपक्रम राबवून नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. या उपक्रमांची माहिती सातत्याने जनतेपर्यंत पोहोचविणाऱ्या पत्रकारांच्या कार्याची विशेष दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला.
आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली हयातनगर जिल्हा परिषद सर्कलचे बाळू गोडबोले यांनी जनसेवा सप्ताहातील विविध उपक्रमांना व्यापक प्रसिद्धी देणाऱ्या पत्रकारांचा गौरव केला. यावेळी सर्व पत्रकारांना भेटवस्तू म्हणून बॅगचे वाटप करण्यात आले.
समाजातील विविध उपक्रम, जनहिताच्या योजना आणि सेवा कार्याची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जनसेवा सप्ताहातील सात दिवस पत्रकारांनी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याबद्दल बाळू गोडबोले यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या सन्मानामुळे पत्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.दरम्यान, जनसेवा सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. नव्या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशामुळे पक्षसंघटनेला नवे बळ मिळाले असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
रक्तदानाचा संस्कार, समाजसेवेचा संकल्प, विविध जनहिताचे उपक्रम, नव्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश आणि पत्रकारांचा सन्मान अशा बहुआयामी कार्यक्रमांनी जनसेवा सप्ताहाची सांगता संस्मरणीय ठरली. सात दिवस समाजसेवेचा ध्यास घेऊन राबविण्यात आलेल्या उपक्रमांमुळे वसमतमध्ये जनसेवेचा नवा आदर्श निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.