भारतीय जनता कामगार महासंघाच्या नायरा एनर्जी डिपो शाखेचे उद्घाटन

Mon 10-Aug-2026,09:49 PM IST -07:00
Beach Activities

भारतीय जनता कामगार महासंघाच्या नायरा एनर्जी डिपो शाखेचे उद्घाटन

( नवेद पठाण मुख्य संपादक )

वर्धा : वर्धा-पुलगाव रोडवरील नायरा एनर्जी डिपोमध्ये भारतीय जनता कामगार महासंघ (महाराष्ट्र) अंतर्गत नायरा एनर्जी डिपो शाखेचे आज फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य तसेच कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कामगारांच्या विविध समस्या, त्यांच्या हक्कांचे संरक्षण तसेच कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या शाखेच्या माध्यमातून नायरा एनर्जी डिपोमधील कामगारांच्या समस्या व प्रश्न संघटितपणे मांडून त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

यावेळी भारतीय जनता कामगार महासंघाचे प्रदेश सचिव व युनियन अध्यक्ष मिलिंद देशपांडे (एल.एल.एम.), युनियन कार्याध्यक्ष गौरव गावंडे, संघटन प्रमुख आकाश कहाते, सहसंघटन प्रमुख कुणाल शेंद्रे, उपाध्यक्ष सुरज देशमुख, सचिव सचिन चौधरी, सहसचिव देवेंद्र लोखंडे, संयुक्त सचिव नितीन उईके यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य अक्षय खोब्रागडे, अमोल गायगोले, नवनीत पूणसे, प्रवीण पांडे, महेश कहाते, शंकर जामनकर, चेतन पूनसे, निखिल पूनसे, मनीष मरगडे, नितेश पारिसे, भाविक आखूड, अमोल मोहिते, प्रवीण बोरकर, सुरेश कुरसंगे, शुभम बलवीर, मनोज राऊत, अमोल तडस, धीरज कांबळी, सागर सोनवणे, प्रमोद अलोणे, हेमंत वाटकर, गौरव मीरापूरकर, सतीश इंगोले, धनराज राऊत, सचिन शेंद्रे, श्रावण उईके, रविंद्र तोटोडे, महादेव टिपले, आशिष वाघ, गणेश सायंकाळ, सूर्यकांत बोरकर, अमोल बोरकर, आकाश खोडके, शरद अंबाडरे, नरेश बैरीसार, वैभव गव्हाळे, सिद्धार्थ पुरवटकर, शुभम चौधरी, प्रशांत ठाकरे, राकेश बोरकर, पंडित गायकवाड, राहुल झंझोटे, शुभम चिखलकार, शुभम झाडे, अक्षय गायकवाड, शुभम ठाकरे, निखिल झिलपे, शुभम भिवगडे, रवींद्र कातोडे, विपुल निस्ताने, वैभव गायकवाड, वैभव अग्निहोत्री, सागर देशमुख, सुनील सांगले, प्रशांत मोजणकर, रितेश मसराम, श्रीकृष्ण नागोसे, दीपक चौधरी, विकास बोरकर, सुरज शेंद्रे, चंद्रशेखर मसराम, हर्षल उईके, धनंजय मडावी, सौरभ चांदेनकर, शुभम बोरकर, पवन नागोसे आणि संकेत करपाते यांची उपस्थिती होती.

कामगारांच्या हक्कांसाठी संघटितपणे लढा देत त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आगामी काळात अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.