मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते विशाल अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

Wed 16-Sep-2026,10:02 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली 

 हिंगोली : वसमत शहरात आज  ७९ व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त तालुक्यातील सुप्रसिद्ध शासकीय सार्वजनिक वाचनालयात वर्ग "अ" स्वातंत्र्यसेनानी गंगाप्रसादजी अग्रवाल यांचे पाल्य विशाल अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण दि. १७ सप्टेंबर गुरूवारी पार पडले. 

    सार्वजनिक वाचनालयाचे विश्वस्त तथा सचिव सत्यविजय अन्वेकर, सामाजिक कार्यकर्ते विशाल अग्रवाल, सहायक ग्रंथपाल माधवी पुजारी, शिवाजी दुधाने, अनिकेत पांडे,  

हरिभाऊ नाईकवाल, साहित्यिक प्रकाश अंभोरे, पांडुरंग कदम, बाळकृष्ण उभे, पि. बी. नादरे आदींची उपस्थिती होती.

    प्रारंभी ब्रहमीभूत स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, तत्कालीन स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ, हुतात्मा गोविंद पानसरे, गंगाप्रसादजी अग्रवाल यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते विशाल अग्रवाल यांच्या हस्ते ७९ व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त ध्वजारोहण करण्यात आले. सामुदायिक राष्ट्रगीत-राज्यगीत पार पडले. 

मराठवाडा मुक्ती संग्रामात हुतात्मा-स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्यात आले. स्वातंत्र्यसैनिकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान नवीन पिढीला प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते विशाल अग्रवाल यांनी केले.