हिंगणघाटच्या वीरा स्पोर्टिंग क्लबच्या २२ कुस्तीपटूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत दमदार कामगिरी
हिंगणघाटच्या वीरा स्पोर्टिंग क्लबच्या २२ कुस्तीपटूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत दमदार कामगिरी
प्रतिनिधी : मंगेश लोखंडे, हिंगणघाट
हिंगणघाट, दि. १७ सप्टेंबर २०२६ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वर्धा यांच्या वतीने जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन टाका मैदान, नगर परिषद वाचनालय परिसर, हिंगणघाट येथे करण्यात आले.
या स्पर्धेत भारत विद्यालय, हिंगणघाट येथील १४, १७ आणि १९ वर्षांखालील वयोगटातील कुस्तीपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करत विविध गटांत विजेतेपद मिळविले. एकूण २२ खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या कुस्ती कौशल्याची प्रभावी छाप पाडली.
विजेते खेळाडू : लक्ष्मी कोकडे, मनस्वी जवादे, मानसी अजय शेराम, निवृत्ती धोटे, पल्लवी मुळे, पायल इंगळकर, इशा खेळकर, स्वरा सतमवार, तनिष डभारे, भावेश भुते, गणेश गुंजेवार, अजिंक्य सूर्यवंशी, प्रणव परमोरे, सम्यक बलवीर, मोनीष सोनुले, आदित्य देवडे, अश्विन ठमके, विश्वास, कृष्णा भोकरे, मयंक जीवनकर, कनिका राजेश मुळे आणि मंथन भुते यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
या यशामुळे भारत विद्यालयाच्या कुस्तीपटूंनी हिंगणघाटच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा ठसा उमटविला असून, आता हे सर्व खेळाडू आगामी विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत.
या उल्लेखनीय यशाबद्दल वीरा स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष व संचालक अजय मुळे, मार्गदर्शक अनिल जवादे, शाळेच्या प्राचार्या खैरकर, तालुका क्रीडांगण संयोजक बी. एल. खांडरे तसेच नानोटकर, विलास भोमले, दिनेश वाघ, गोपाल मांडवकर, पंकज ठाकरे, माटे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.
यावेळी राम मेश्राम, बबलू जवादे, संजय भुते, सुमित हिंगे, राहुल घोटकर, बालू वैद्य, बालू सावध, योगेश झापे, हेमाताई दुरबुडे, सौरभ डहाळकर, सुधांशू धोबे, रोहित मुळे, गोलू पाल, भूषण तराळे, प्रेम जवादे, अनुष्का सोमलकर, आशिष वानखेडे, नंदनी पाल, गोल्डी जीवनकर, अजय शेराम, श्याम इजमुलवार, शरद भोकरे, रवी दुरबुडे, अनिल मुन, केशव दोडके, भारत मुन आणि किसना ठाकरे आदींनी खेळाडूंचे अभिनंदन करून आगामी विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.