वसमत येथे भिम टायगर सेनेचा भव्य भिम महोत्सव उत्साहात संपन्न; हजारो आंबेडकरी अनुयायांची उपस्थिती

Sun 01-Nov-2026,06:05 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली

हिंगोली : वसमत येथे भिम टायगर सेना आयोजित भव्य भिम महोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दि. 31 ऑक्टोबर 2026 रोजी जि.प. मैदान, वसमत येथे हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पूज्य भदंत पय्याबोधी महास्थवीर, नांदेड हे होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकप्रिय आमदार राजूभैय्या नवघरे हे होते. स्वागताध्यक्ष म्हणून उपनगराध्यक्ष राजकुमार एंगडे हे उपस्थित होते.

सायंकाळी 6:00 वाजता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भीमशाहीर मनोजराजा गोसावी, बबनदादा दिपके, रिता खंडारे, आम्रपाली खराटे यांच्या भीम गीतांनी आणि प्रबोधनाने संपूर्ण मैदान दणाणून सोडले. या भव्य भीम महोत्सवाचा हजारो रसिकांनी आनंद घेतला.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून भिम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके, श्रीरंग थोरात, ॲड. रणधीर तेलगोटे, एस.पी. मुळे, यशवंतराव उंबरे, प्रा. सुभाष मस्के, गौतम दवने, रवी भुसावळे, गजानन वैद्य, अनिताताई इंगोले, गौतम पारखे, बालाजी मोरे, आनंद करवंदे, अनिल पंडित, राहुल करवंदे, भीमा कांबळे, नगरसेवक गौतम वाव्हळे, आविष्कार मनोहरे, युवराज आवटे, भीमराव सरकटे, मारोती इंगोले, बाबुराव कांबळे, सिद्धार्थ काटकांबळे, महेंद्र गायकवाड यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबासाहेब मोरे, आदित्य एंगडे, मंगेश गवळी, बिट्टूभाऊ एंगडे, विनोद दातार, आकाश तिगोटे, सुमित गायकवाड, अजय कोल्हे यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन भिम टायगर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष विजयकुमार एंगडे व मराठवाडा युवा अध्यक्ष सम्राटराजे गायकवाड यांनी केले होते.

या भव्य भीम महोत्सवाला वसमत परिसरासह जिल्हाभरातून लाखो आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.