करूनि होलिका 'नमन', करू या, व्यसनांचे 'दहन'
प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली:वसमत देश अन् राज्यातील आनंददायक होळी, रंगपंचमीच्या निमित्ताने गल्ली बोळातून साजरा होत असलेला सण उत्सव साजरा करताना "करुनि होलिका नमन, करा व्यसनांचे दहन" असे समाजोपयोगी आवाहन सामाजिक संस्था संघटनानी दि. १ मार्च रविवारी वसमत येथे करण्यात आले आहे. उत्सव साजरा करतांना सणाचे महत्त्व साकारण्यासाठी आनंद साजरा करता यावा. सामाजिक मूल्य वृद्धिंगत करताना कुटुंब वत्सल होउन दडलेल्या व्यसनांचे दहन करावे असे सामाजिक कार्यकर्ते विशाल अग्रवाल यांनी सांगितले.
होळी साजरी करतांना तंबाखू, गुटखा, विडी, सिगारेट, चरस, गांजा, व्हाईटनर तरळ पदार्थ आदी व्यसनांचे दहन करून व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पुढाकार घेण्यचे आवाहन नशामुक्त भारत अभियान अंतर्गत, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र सर्वोदय मंडळ, व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंच, नशामुक्त भारत अभियानाच्या वतीने करण्यात आले आहे. प्रबोधन, संकल्प, व्यसनमुक्तीचे महत्त्व, समुपदेशन, मतपरिवर्तनातून...व्यसनमुक्तीकडे वाटचाल करण्याची प्रेरणा होळी, रंगपंचमीच्या सण, उत्सवातून घ्यावी असा सामाजिक संदेश देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.