छत्रपती शिवाजी महाराज ऑनलाइन व्याख्यानमालेच्या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न
छत्रपती शिवाजी महाराज ऑनलाइन व्याख्यानमालेच्या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न
नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा
कारंजा (घा.) येथील श्री समर्थ दादाजी महाराज संस्थान, कारंजा तसेच सकल कुणबी मराठा वेल्फेअर फाउंडेशन, कारंजा यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शुक्रवार, दि. ६ रोजी दादाजी महाराज देवस्थान, कारंजा येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य मधुसूदनजी डोबले होते. प्रमुख पाहुणे म्हणून सतीशजी काळे, उत्तमरावजी नारिंगे, श्रीमती संगीताताई भुयार, अनिस मुल्ला आणि विनोद चाफले उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रियाशी डोंगरे, रूधिका उघडे, नव्या इंगळे, अंजली जिचकार आणि मोहिनी चोपडे यांनी स्वागतगीत सादर करून केली.
यावेळी कोलकाता येथे झालेल्या राष्ट्रीय हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळलेल्या कु. नव्या कैलास चेर तसेच NMMS परीक्षेत मॉडेल हायस्कूल, कारंजा येथून प्रथम क्रमांक मिळवलेल्या कु. श्रावणी प्रवीण भांगे यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यानंतर ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. गट ‘अ’ मधून प्रथम क्रमांक कु. आनंदी राजेंद्र इंगळे, द्वितीय क्रमांक शिवांश मनोज वानखेडे आणि तृतीय क्रमांक कु. भार्गवी गुणवंत मुडे यांनी पटकावला. तर गट ‘ब’ मधून प्रथम क्रमांक दक्ष भरत बोबडे, द्वितीय क्रमांक मंथन गुणवंत मुडे आणि तृतीय क्रमांक कु. एकता मनोज डोंगरे यांनी मिळवला.
स्मृतिचिन्हे संस्थानचे सदस्य हर्षलजी भुयार यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ विजेत्यांना त्यांच्या मातोश्री श्रीमती संगीताताई भुयार यांच्या हस्ते प्रदान केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा सकल कुणबी मराठा वेल्फेअर फाउंडेशन, कारंजाचे अध्यक्ष सतीशजी काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रदान केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुणवंत मुडे यांनी केले, तर प्रस्ताविक मनोज वानखेडे यांनी मांडले.
यावेळी अध्यक्षीय भाषणात ग्रामगीताचार्य मधुसूदन डोबले म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करून महापुरुषांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणे हे अत्यंत स्तुत्य कार्य असून श्री समर्थ दादाजी महाराज संस्थान, कारंजा हे कार्य सातत्याने करत आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र इंगळे, उमेश पाचपोहर, प्रवीण भिसे, मंगेश जाचक, मनोज डोंगरे, दशरथ डांगरे, विभाकर ढोले, विनोद केळझरकर, मनीष सरोदे आणि गंगाधरराव यावले यांनी विशेष परिश्रम घेतले.