अल्लीपूरमध्ये छावा सेना मित्र परिवाराकडून भव्य शिवजयंती मिरवणूक
अल्लीपूरमध्ये छावा सेना मित्र परिवाराकडून भव्य शिवजयंती मिरवणूक
अल्लीपूर | ता. प्रतिनिधी : सुनील हिंगे
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अल्लीपूर येथे छावा सेना मित्र परिवाराच्या वतीने ६ मार्च २०२६ रोजी भव्य शोभायात्रा, मिरवणूक तसेच पालखी दिंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मिरवणूक गावातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली असून कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या मिरवणुकीत विविध आकर्षक देखावे सादर करण्यात आले. विशेष म्हणजे मुस्लिम बांधवांनीही मिरवणुकीत सहभागी होत लिंबू सरबत वाटप करून सामाजिक ऐक्य व समानतेचा संदेश दिला. गावकऱ्यांनीही या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहकार्य केले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विजयकुमार घुले सर, वर्षा तांदूळकर मॅडम, सतीश काळे, राजू वांदिले, शुभम साखरकर, सौरभ दुमणवार, वैभव सुरकार, अक्षय हिंगे, संकेत गोलाईत, राहुल सोनकुसरे, दानिश पठाण, सार्थक वरघने, भूषण हजारे, राहुल शेंडे, निखिल बगवे, प्रेम अवचट, गौरव ढगे, धीरज गवळी, अनिकेत घंगारे, ऋषिकेश गिरडे, सोहम सुरकार, धीरज सुरकार, गणेश सुरकार, वेदांत वराडे, नोबल बेले, स्वप्निल धोंगडे, आकाश हिंगे, शेखर धोंगडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रम भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.