आरोपीच्या कपड्यावरून शोध घेत चोरीची मोपेड जप्त रेल्वे पोलीसांची कारवाई
आरोपीच्या कपड्यावरून शोध घेत चोरीची मोपेड जप्त रेल्वे पोलीसांची कारवाई
वर्धा प्रतिनिधी. युसुफ पठाण
वर्धा, वर्धा रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा यांनी चंद्रपूर रेल्वे स्टेशन परिसरातून चोरीस गेलेली मोपेड शोधून काढत आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे.
फिर्यादी इंदुबाई विनोद कुमार कबाडे (वय 30, रा. चंद्रपूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या चंद्रपूर रेल्वे स्टेशन येथील बुकिंग ऑफिसमध्ये गेल्या असताना त्यांनी बाहेर उभी केलेली त्यांची ऍक्टिवा 4G मोपेड (क्रमांक MH 34 BL 1369) अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. याप्रकरणी रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा येथे अप. क्र. 68/26 कलम 303(2) BNS अन्वये 08 एप्रिल 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित आरोपीचा शोध सुरू केला. आरोपीच्या कपड्यांच्या आधारे ओळख पटवत गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीचा माग काढण्यात आला. त्यानुसार नरेश समाधान भांगे (वय 42, रा. अमरावती) याला ताब्यात घेण्यात आले.
पोलीस चौकशीत आरोपीकडून चोरीस गेलेली सुमारे 90,000 रुपये किंमतीची मोपेड जप्त करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक लोहमार्ग नागपूर श्री मंगेश शिंदे, अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा येथील सपोनि पंकज ढोके (प्रभारी अधिकारी), पो. उपनिरीक्षक अंगद कोतवाड तसेच पोलीस अंमलदार अखिलेश चौधरी, निलेश निकोडे व चंदन डेहनकर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.