वर्धा शहर पोलिसांची धडक कारवाई; अवैध विदेशी दारू वाहतूक करणारे दोन आरोपी जेलबंद

Sun 26-Apr-2026,12:51 AM IST -07:00
Beach Activities

वर्धा शहर पोलिसांची धडक कारवाई; अवैध विदेशी दारू वाहतूक करणारे दोन आरोपी जेलबंद

 

प्रतिनिधि .युसूफ पठाण वर्धा 

 

वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण पथकाने अवैध विदेशी दारू वाहतूक प्रकरणात मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत एकूण 7,09,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलिसांनी आरती चौक परिसरात नाकेबंदी केली. यावेळी एमएच 32 एनपी 7727 क्रमांकाची मारुती सुझुकी बलेनो कार संशयास्पदरीत्या येताना दिसली. पोलिसांनी वाहन थांबवण्याचा इशारा दिला असता चालकाने न थांबता जेल रोडकडे पळ काढला. पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून वाहन अडवले.

वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये बिनापरवाना विदेशी दारूचा मोठा साठा आढळून आला. यामध्ये ऑफीसर चॉईसच्या 750 एमएलच्या 168 बाटल्या, ऑफीसर चॉईस ब्ल्यूच्या 36 बाटल्या तसेच रॉयल स्टॅगच्या 36 बाटल्या जप्त करण्यात आल्या. याशिवाय एक चारचाकी कार व मोबाईल फोनही जप्त करण्यात आला.

या प्रकरणी नौशाद शाह रमजान शाह आणि राकेश गंगाधर चतारे (दोन्ही रा. इंदिरानगर, आर्वी नाका, वर्धा) यांना अटक करून दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर, पोलीस निरीक्षक संतोष ताले व प्रभारी पोलीस निरीक्षक अजय भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, गजेंद्र धर्मे, नितीन ईटकरे, सचिन धुर्वे, अमोल तिजारे व इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड करीत आहेत.