वर्ध्यात निषेध आंदोलन; चिमुकल्या मुलीला श्रद्धांजली

Mon 04-May-2026,04:17 AM IST -07:00
Beach Activities

वर्ध्यात निषेध आंदोलन; चिमुकल्या मुलीला श्रद्धांजली

प्रतिनिधि युसूफ पठाण वर्धा 

नसरापूर (ता. भोर, जि. पुणे) येथील चार वर्षांच्या चिमुकल्या मुलीवरील अत्याचार व खून प्रकरणाच्या निषेधार्थ वर्धा येथे दि. ४ मे रोजी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात लीगल कट्टा व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनादरम्यान पीडित मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली.

सामाजिक कार्यकर्ते कपिल गोडघाटे यांनी भावना व्यक्त करत, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देऊन फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. अशा विकृत प्रवृत्तीमुळे समाजातील महिलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी शासनाने या प्रकरणात तातडीने कठोर पावले उचलून पीडितेला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

या आंदोलनात वर्ध्यातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये मयूर डफळे, दुष्यंत ठाकरे, प्रतीक पवार, समर्थ कुकडे, नीरज ताकसांडे, ॲड. निखिल बुरबुरे, पंकज घायवाटे, गौरव पंतवणे, ॲड. पूजा जाधव, प्रा. अशोक चोपडे, हर्षवर्धन नाखले, कपिल थुटे, तसेच गेडाम सर आदींचा समावेश होता.