वसमतच्या नवनियुक्त तहसीलदार सागर नन्नावरे यांचा व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेकडून सत्कार

Thu 21-May-2026,07:13 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली:वसमत येथे नवनियुक्त तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारलेल्या सागर नन्नावरे यांचा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ वसमत तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने उत्साहपूर्ण स्वागत व सत्कार करण्यात आला. पत्रकार बांधवांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करत नव्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

या सदिच्छा भेटीदरम्यान पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वसमत तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या विविध समस्या, प्रलंबित प्रश्न तसेच प्रशासनासमोरील अडचणी याविषयी तहसीलदार सागर नन्नावरे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. लोकहिताच्या प्रश्नांना प्राधान्य देत तालुक्यातील विविध समस्या तातडीने मार्गी लावाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

तहसीलदार सागर नन्नावरे यांनी पत्रकारांनी मांडलेल्या विषयांची गांभीर्याने दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रशासनातील कामकाज पारदर्शक ठेवून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कायम तत्पर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पत्रकार संघटनेलाही पूर्ण सहकार्य केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

या सत्कार कार्यक्रमास ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ वसमत पत्रकार संघटनेचे ज्येष्ठ पत्रकार संजय बर्दापुरे, शमीम सिद्दिकी, प्रा. नामदेव दळवी, गिरीश देशमुख, साईनाथ पतंगे, अॅड. नाहीद सिद्दिकी, एजाज शेख, नितीन वाघिले, बालाजी अडकिने, मुन्ना फारुकी यांच्यासह तालुक्यातील अनेक पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.