शिवसेने तर्फे स्व अजित दादा पवार यांना श्रद्धांजली

Thu 29-Jan-2026,06:26 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी :-राहील शेख काटोल

काटोल::महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस चे पक्ष प्रमुख अजितदादा पवार यांच्या अकस्मात अपघाती मृत्यू मुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली त्यांच्या अकस्मात निधनाने राजकीय पोकळी कधी ही नं भरून निघणार नाही, सर्व सामान्य जनतेच्या मनावर राज्य करणारा, गोरगरीबानवर स्वतःचे कुटुंबा प्रेमाने प्रेम करणारा नेता असा अकस्मात निघून जाणे ही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनाला वेदना देणारी घटना आहे, प्रसंगी काटोल शिवसेना तर्फे नमाजी अली यांच्या संपर्क कार्यालयात अजित दादा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, प्रसंगी विदर्भ सह संघटक नमाजी अली, जिल्हा संघटक दिलिप गायकवाड, कामगार सेना जिल्हा समन्वयक प्रशांत बारई, जिल्हा उपाध्यक्ष माधव अनवाने, काटोल शहर प्रमुख विपुल देवपूजारी, मंगेश वाढबुधे,अरुण कोल्हे, जितेंद्र वंजारी,विक्रम सावळकर,अमोल थोटे,धनंजय भोयरकर,रिजवान सय्यद आदी सर्व शिवसैनिक उपस्थित होते