तरूणांना व्यसनमुक्तीच्या प्रवाहात आणा सिनेअभिनेते सिद्धार्थ जाधव यांचे प्रतिपादन

Sat 09-May-2026,12:10 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली 

नांदेड : नांदेड येथे शालेय-महाविद्यालयीन, कुमार वयीन मुले,युवकांना जनजागृतीच्या माध्यमातून व्यसनमुक्तीच्या प्रवाहात आणणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध सिनेअभिनेते तथा महाराष्ट्र शासन नियुक्त व्यसनमुक्ती ब्रॅंड ॲम्बेसेडर सिद्धार्थ जाधव यांनी नांदेड येथे हिंगोली जिल्ह्यातील व्यसनमुक्ती चळवळीतील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना दि. ७ गुरूवारी केले आहे. 

      नांदेड येथे सांस्कृतिक कार्यक्रमातील फावल्या वेळेत सिनेअभिनेते सिद्धार्थ जाधव यांनी व्यसनमुक्तीचा प्रचार आणि प्रसार उपक्रम राबविणाऱ्या नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना संवाद साधला. नशाबंदी मंडळाचे कार्यकर्ते विशाल अग्रवाल, नशामुक्त भारत अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्टुडंट्स प्रहरी क्लबच्या मार्गदर्शिका शुभदा सरोदे, व्यसनमुक्ती दूत मृण्मयी अग्रवाल आदींची उपस्थिती होती. सिनेअभिनेते सिद्धार्थ जाधव यांनी वाढत्या व्यसनाधीनतेच्या समस्येवर चिंता व्यक्त केली. व्यसनमुक्ती कार्याच्या व्याप्तीने महिलांना दिलासा मिळेल. मुलांना मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संधी उपलब्ध होतील. कौटुंबिक आर्थिक सुधारणा घडवून येईल. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत, महाराष्ट्र शासनाचे व्यसनमुक्ती धोरण-२०११, तंबाखूमुक्त शाळा अभियान, नशामुक्त भारत अभियान, व्यसनमुक्ती प्रतिज्ञा आदी विधायक उपक्रम विविध शैक्षणिक संकुलामध्ये राबविण्याचा कानमंत्र व्यसनमुक्ती चळवळीतील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना दिला आहे.