केळझरमध्ये १.२३ किलो गांजासह तिघांवर कारवाई

Tue 06-Oct-2026,05:41 AM IST -07:00
Beach Activities

केळझरमध्ये १.२३ किलो गांजासह तिघांवर कारवाई

प्रतिनिधि इरशाद शाह वर्धा 

वर्धा : अंमली पदार्थांची विक्री व तस्करी करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली. केळझर येथील उड्डाणपुलाच्या बोगद्याखालील सेवा रस्त्यावर सापळा रचून गांजाची वाहतूक करणाऱ्या आरोपीला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याकडून १ किलो २३ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईल असा एकूण १ लाख ७१ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. ५ ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे केळझर येथे कारवाई करण्यात आली. यावेळी अजयसिंग ऊर्फ सुखा किसनसिंग बावरी (रा. केळझर) हा पल्सर दुचाकी क्रमांक एमएच ४० डीडी ६२२२ वरून गांजाची वाहतूक करताना आढळून आला.

पोलिसांच्या तपासात अजयसिंग हा त्याचा भाऊ भोलासिंग किसनसिंग बावरी याच्यासोबत गांजाच्या विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे समोर आले. तसेच गांजा त्यांचा मामा गगनसिंग अगदसिंग दुधानी (रा. रायपूर, हिंगणा, नागपूर) याच्याकडून खरेदी केल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक आशिषसिंग ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक सिनुकुमार बानोत तसेच पोलीस अंमलदार अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित आणि सागर भोसले यांनी केली.