कारंजा घाडगे पोलिस ठाण्याला मिळाले ‘खरे सिंघम’
मुख्य संपादक नावेद पठाण कारंजा घाडगे
कारंजा घाडगे पोलिस ठाण्याला मिळाले ‘खरे सिंघम’
कायद्याचे रक्षक, जनतेचे खरे मित्र : ठाणेदार प्रल्हाद मदन
कारंजा घाडगे पोलिस ठाण्याचे ठाणेदार मा. श्री. प्रल्हाद मदन यांनी आपल्या कार्यकाळात कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून परिसरात गुन्हेगारांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. शांतता व सुव्यवस्था राखत गुन्हेगारी रोखण्यासाठी ते सौजन्यपूर्ण, संवेदनशील आणि मानवी मूल्यांची जाण ठेवून कार्य करत असल्याचे दिसून येत आहे.
जनतेशी थेट संवाद साधणे, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, तक्रारी ऐकून घेऊन सहानुभूतीपूर्वक मदत करणे, तसेच लाचखोरीसारख्या गैरकृत्यांपासून दूर राहून प्रामाणिकपणे काम करणे, यामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होत आहे. कायद्याचे रक्षक हे जनतेचे मित्र असावेत, हेच ठाणेदार प्रल्हाद मदन आपल्या कार्यातून दाखवून देत आहेत.
कारंजा घाडगे परिसरातील गावखेड्यांमध्ये सध्या एकच चर्चा सुरू आहे की, पोलिस ठाण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मा. प्रल्हाद मदन यांच्या कार्यकाळात खुलेआम गुन्हेगारीवर कठोर कारवाई करून गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसविण्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्ते रोशन वरठी यांनी ठाणेदार प्रल्हाद मदन यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना सांगितले की, अशीच धडाकेबाज व लोकाभिमुख कामगिरी भविष्यातही कायम राहावी, हीच कारंजा घाडगे परिसरातील जनतेची अपेक्षा आहे.